सोमवार, डिसेंबर ०३, २०१२

विलंब: पुण्याचा विकास आराखड्याचा

इसवीसन २००७ ते २०२७ ह्या कालावधीचा पुणे शहराचा विकास आराखडा परवा म्हणजे बुधवारी, ५डिसेंबरला,  महानगरपालिका सभागृहात चर्चेसाठी येणार आहे. मी इसवी सन एव्हढ्याच साठी म्हटलं की २००७ पासून जी योजना सुरु व्हायला हवी होती, त्याचा पहिला मसुदा खरं म्हणजे कधी चर्चेला यायला पाहिजे? सांगा बरं?  साधारण दोन  किंवा तीन वर्ष आधी? म्हणजे २००४ च्या सुमारास?  बरोबर ना?

पण, तो आला आहे २०१२ च्या शेवटच्या महिन्यात म्हणजे सुमारे ८ वर्ष उशीरा. तब्बल ८ वर्ष!

महानगरपालिकेतील अनुभवी माणसं सांगतात की अगदी गतीनं जरी ह्यापुढची प्रक्रिया पुढे गेली तरी २०१४ किंवा १५ मध्ये हा आराखडा मंजूर होईल. म्हणजे २००७ पासून पुण्याचा विकास काय आणि कसा असायला हवा हे समजून त्याची अंमलबजावणी सुरु होईल २०१५ च्या सुमारास. म्हणजे जवळ जवळ ८ वर्ष उशीरा.

म्हणून म्हणालो: इसवीसन!

शहराचा बट्ट्याबोळ झालेला असताना साधं नियोजन करायला लागलेला इतका अक्षम्य उशीर ही कुणाची चूक आहे? का लागला इतका उशीर? कुणाचं नुकसान झालं ह्यामुळे? 

उशीर झाला त्याला सर्वप्रथम जबाबदार आहे प्रशासन. आपल्या करदात्यांच्या पैशातून त्यांना वेळेवर आणि बिनचूक कामं करण्यासाठीच पगार मिळत असतो. त्यांच्याकडून अक्षम्य दिरंगाई झाली. त्याचं गांभीर्य त्यांना नव्हतं. आपण जितका उशीर लावू तितका शहराला, शहरातल्या माणसांना जास्त त्रास भोगावा लागणार आहे हे त्यांच्या डोक्यात नव्हतं.

दुसरे जबाबदार आहेत राजकारणी आणि नगरसेवक. त्यांनी ही प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून तगादा लावायला हवा होता. "माझा काय फायदा?" ह्या पेक्षा "सर्वांचा काय फायदा?" ह्याकडे लक्ष द्यायला हवे होते. हा 'विकास आराखडा' कुणाच्या फायद्यासाठी करण्यात आला हे आता हळूहळू पुढे येईलच.

तिसरे जबाबदार आहोत: आपण. पुण्याचे नागरिक. आपल्या शहराचे पुढील वीस वर्षांचे नियोजन चालू आहे ह्याची आपल्याला फारशी जाण नव्हती, माहितीही नव्हती. आपण जागे नव्हतो.

झालं ते झालं. पण, अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही संधी आहे मित्रांनो.

एकदा का हा आराखडा पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात मांडला गेला की मग तो खुला आहे. जरी त्याला फक्त एक महिना अवधी असला तरी तेंव्हा संधी आहे. त्यात नागरिकांनी सहभाग देणे आवश्यक आहे. आपल्या सुचना देण्याची गरज आहे. आपल्या आसपास काय होतं आहे, कुठल्या सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत हे पाहून तसंच होतंय की नाही हे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे. स्वत: रस घेऊन, वेळ काढून हा विकास आराखडा पहाण्याची गरज आहे. नाहीतर नको ते लोक घुसतील, फायदा करून घेतील आणि मग नुसता शंख करण्यावाचून आपल्याकडे पर्याय नसेल.

तेंव्हा, जागे रहा पुणेकरांनो. जागे रहा. ...... जय महाराष्ट्र!

अनिल शिदोरे   

७ टिप्पण्या:

  1. suchana jaroor daou , tya karita pahile Pune Mahanagar palika complaint sathi mail id tayar kara ani jantela dya , bagha tumhala Pune Saharachya kanakoprayatla samasya mahit hotil ani sutlyanantar tyacha hi mail jante kadun yael.

    उत्तर द्याहटवा
  2. punya madhle dada j arundha raste ahet te adhi rundha hoyla pahijet karan ki arunda raste aslya mule apaghatan che praman vadat chale ahe, tya ch brbr j zopadpati rahivasi ahet tyana j ghar ata bandhun dile ahet tithe tyana lavkarat lavkar halwa ve mhnjhe zopdya halawlya tar raste he runda hotil, swachta he dekhil vadel, ashe manase icha ahe dada.

    उत्तर द्याहटवा
  3. Vandan Ghaate, aapan aaplya Pune Development Plan baddal chya takrari "ask.mns.pune@gmail.com" hya email ID var pathvu shakta...

    उत्तर द्याहटवा
  4. नमस्कार सर !!!!!
    पुण्याचा नागरिक आहे याचा अभिमान आहे, पुण्याच्या विकासाठी सर्वात म्ह्व्त्वाच आहे ते वाहतुक व्यवस्था नंतर पाणी, वीज, रस्ते ?? रिंग रोड च नियोजन आराखडा चांगल असून ते व्यवस्थित व्हावं ,पुणे शहर, तसेच पुण्यापासून ग्रामीण भागात (तळेगाव, वडगाव , खडकवासला , बाणेर, सासवड , उरळीकांचन , राजगुरुनगर इ.) जाण्यासाठी पुणे महानगर पालिकेच्या गाड्या सक्षम नाही. ह्या ठिकाणच्या गाड्याच्या फेऱ्या वाढवायला पाहिजेत त्यामुळे बस थांब्यावर होणारी गर्दी कमी होईल आणि चोर,पाकीटमार, खिसेकापू च प्रमाण कमी होईल..., खर तर बी.आर .टी साठी इवढा खर्च करणे गरजेच नव्हते अस मला वाटते . बर जितका खर्च आपण बी.आर .टी साठी केला तोच खर्च आपण काही ठिकाणी उड्डाण पूल, भुयारी मार्ग (गाड्या जाण्या साठी ) बाधण्यासाठी केला असता तर नक्कीच वाहतुकीची समस्या कमी झाली असती. आज बाणेर हून हडपसर ला बस ने जाण्यासाठी किमान २ तास लागतात? का? ठिसाळ वाहतुक व्यवस्था..
    मी २ वर्ष मलेशिया ला होतो आपल्या महाराष्ट्र एवढा देश आहे पण वाहतुक, मेट्रो , उड्डाण पूले, रस्ते ,वीज याच अचूक नियोजन... २ वर्षा मध्ये कधीही लाईट गेल्याचा अनुभव आला नाही .आणि आपल्या पुण्यात ??? पहिले आपण बोलायचो " पुणे येथे काय उणे".. पण आता पुणे येथे उणेच उणे ...आणि पुण्यासाठी मेट्रो हा एक चांगला पर्य्याय आहे आणि तो लवकरात लवकर ह्वावा हिच पुणेकराची इच्छा .
    ५ तारखेच्या चर्चेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेछा .. दादा मी तुम्हाला प्रतेक्ष्य भेटलो नाही ( भेटण्याची इच्छा आहे) पण, तुमच्या सारख्या समाजकारण करनार्या लोकांचा अभिमान आहे, तुमचे विचार , समाज कल्याण साठी स्वताला झोकून देण्याच्या तुमच्या स्वभावाला माझा मनापासून सलाम !!!
    तुमचा चाहता !!!! जय महाराष्ट्र !!!!

    उत्तर द्याहटवा
  5. DP should have a high level vision for Pune. What kind of Pune do we envisage. Then each plans and reservations in it should reflect that they will meet our objectives. DP should not be confidential at all (except defense related deals) and should be taken to maximum people possible. Proposed FSI should be questioned debated and ensure if it is sustainable. We should not compromise on environment protection norms.Since we are already late by 8 yrs, now we need to work on war-footing basis and put full pressure on the prashashan to finalize this as soon as possible.
    In present form there is lot of builder loby influence on DP and the same needs to be rectified with larger public interest in consideration. We have lot of hopes from all corporators to serve us and fight for the cause of ppl who elected them.

    उत्तर द्याहटवा