मी राजकारणात आहे ह्याचा मला अभिमान आहे!
मी राजकारणात आहे ह्याचा मला अभिमान आहे!
‘बदल होईल’ असं आपल्यातल्या फारच थोड्या लोकांना वाटतं.
खूपशा लोकांना वाटतं, जे चाललंय तसंच चालणार. फारसा बदल होणार नाही. त्यामुळे होता होईल तेव्हढी मजा करावी, हिंडावं फिरावं, खावं प्यावं. फारसा काही विचार करू नये. विचार करून तरी काय उपयोग?
काहींना वाटतं, ‘बदल होणार नाही’, कारण लोक बिघडलेत. मी चांगला आहे पण लोक वाईट आहेत. राजकारणी वाईट. पोलीस वाईट. शेजारी वाईट. नशीब वाईट. कोणी ना कोणी वाईट, म्हणून बदल होणार नाही.
‘बदल होईल‘ पण तो खूप अवघड आहे, गुंतागुंतीचा आहे, आपल्या जन्मात तरी तो शक्य नाही. मात्र कुठेतरी तो होईल आणि मग तो कसा असेल, कसा होईल, केंव्हा होईल, कुठे होईल ह्याचा काथ्याकूट करणारे काही असतात. ही मंडळी चर्चा खूप करतात. पण फक्त चर्चाच करतात.
काही असतात, जे बदल घडवण्याची अवघड लढाई लढत असतात.
राजकारण ही अशी अवघड लढाई आहे.
मोठमोठी स्वप्न देणं हे राजकारण्यांचं एक काम असतं. म्हणजे “भारत एक महासत्ता बनवू”, “गरीबी हटाव!” वगैरे वगैरे. हे फारसं अवघड नाही, पण तरीही चांगली, लोकांना पटेल अशी स्वप्न देणं कुणालाही जमतं असं नाही.
दुसरी गोष्ट अधिक अवघड आहे.
लोकांना बरोबर घेणं, खूप लोकांना जोडणं, त्यांच्याशी बोलत रहाणं, जमवून घेणं. त्यांना एकत्र काम करायला लावणं, प्रोत्साहन देणं. कधी आपल्या तत्वांना मुरड घालणं, पटत नसलं तरी सोबत रहाणं. लोकांच्या शिव्या खाणं. बदनामी चा धोका पत्करणं.... अश्या कित्येक अवघड गोष्टी.
त्याच्या पुढचं आणखी अवघड.
एव्हढं सगळं सांभाळून मग लोकांच्या जगण्यात निश्चित, शाश्वत असा बदल करणं. त्यासाठी समाजाला मोठ्या बदलासाठी तयार करणं आणि तसा बदल घडला की मग तो लांब काळासाठी टिकवून ठेवणं.
राजकारण म्हणूनच अवघड लढाई आहे.
सहज सोपी नाही, पण ती तशी आहे म्हणूनच लोक राजकारणाला नावं ठेवतात आणि त्यात न पडण्याला कारणं शोधतात. स्वत: जे करू शकत नाही तसा अवघड बदल घडवू शकणारा एखादा नेता मात्र त्यांना विलक्षण आवडतो, अश्या राजकारण्याच्या मागे मागे मग लोक धावतात. अर्थात असं असलं तरीही राजकारण हे त्यांच्या लेखी वाईट ते वाईटच. फक्त गप्पा मारायला आणि टीका करायला त्याचा उपयोग.
आज हे लिहिण्याचं कारण म्हणजे स्टीव्हन स्पीलबर्ग ह्यांचा - मात्र अजून भारतात प्रदर्शित न झालेला - नवा चित्रपट: ‘लिंकन’.
अमेरिकेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यावरचं एक परिक्षण वाचनात आलं. लिंकन एक थोर राजकारणी माणूस, पण अमेरिकेला वंशभेदापासून लांब ठेवता ठेवता तो देश एकसंधही रहावा म्हणून त्यानं काय काय सहन केलं आणि तो कुठल्या कुठल्या अग्निदिव्यातून गेला ह्याचं चित्रण म्हणे ह्या चित्रपटात आहे.
ते असो वा नसो.
मी राजकारणात आहे आणि मला मी राजकारणी असण्याचा का अभिमान आहे हे मला त्यातनं भावलं म्हणून हे लिहिलं.
अनिल शिदोरे
1000% AGREED...!
उत्तर द्याहटवासर, अत्युत्तम, म्हणूनच आम्ही सोबत आहोत.
उत्तर द्याहटवामार्मिक!
उत्तर द्याहटवाAgadi barobar aahe sir rajkaran karat astana saglyach goshtincha yogya vicharkarunach tya karavya lagtat, kaam karna avghad nahi a pan veg veglya vicharanchya lokana ekatra karun kam karun ghen hi goshta rajkarni vyaktich karu shakte, rajkarni lokankade baghnyacha drishtikon pan far vegla asto ani rajkarnyankadun apeksha pan far astat nagrikana 100 kame keli astil ani 1 kaam zal nasel tar keleli 100 kame visrun te 1 kam ka nahi zal mhanun bolnarepan khup bhetat aso aapan rajkarnat aahat yacha aapnala abhiman aahe pan amhala aaplya sobat kaam karnyachi sandhi milali mhanun me aapla abhari aahe aaple Margadashan va Ashirwad asech pathishi rahudet. .... Jai Maharashtra
उत्तर द्याहटवातुमच्यासारखे सहकारी आहेत ह्याचा आनंद आहे.
हटवाDhanyawad sir......
हटवाRajkaranatil pratyek netyachya, karykartyachya manatale he vichar apan ya lekhachya swaroopat mandale ahet!!!Apratim!!!
उत्तर द्याहटवाSir, tumachyasarkhe vichari aani abhyasu lok rajkarnat far kami aahet.
उत्तर द्याहटवाSir I really appreciate your nature of study about various field in depth.What you have written is absolutely right. I believe whatever field we may into, Politics provides us with lots of new learning every-time.
उत्तर द्याहटवाShidore Sir,
उत्तर द्याहटवाKalat pan walat nahi ashi mazya sarkhya anekanchi sthiti ahe aaj. Ani mhunun aaplya sarkhaya jankar samaj karan ani raj karan karnaryanch bot dharun amhi watchal karaycha prayatn karto..
Sarang Dandale
Maitri
मुळात आज हि आपल्या इथले राजकारण हे जातीवर आधारित आहे. जेव्हा लोक वैचारिक भूमिकेतून मतदान करतील तेव्हा बदल शक्य आहे.
उत्तर द्याहटवासागर अंबुलगेकर
नुसतं जातीवर आधारित नाही. .. त्यापेक्षाही गुंतागुंतीचं आहे, पण त्यासाठी खूप काम करावं लागेल.
हटवाछान लेख...आज भारतात अशी परिस्थिती आहे कि राजकारण हे मनी आणि मसल पॉवर चा खेळ झालाय..अमेरिके मध्ये एका मध्यम वर्गीय कुटुंबातील व्यक्ती केवळ गुणवत्ता, वकृत्व कौशल्याच्या बळावर राष्ट्राध्यक्ष होऊ शकते मग माझ्या ह्या लोकशाही देशात अशी राजकीय व्यवस्था का नाहीये असा मला प्रश्न पडतो..
उत्तर द्याहटवाWe need a Anil Shidore in each district of Maharashtra !
उत्तर द्याहटवा