मंगळवार, ऑक्टोबर ११, २०१६

महाराष्ट्रातील रोजगार फक्त मराठी माणसासाठीच: का? कशासाठी?

महाराष्ट्रातील रोजगार मराठी माणसासाठीच: का? कशासाठी?

“महाराष्ट्रात निर्माण होत असलेल्या प्रत्येक रोजगारावर मराठी मुला-मुलींचाच अधिकार” हे वाक्य म्हणजे नुसतं सनसनाटी टाळ्यांचं वाक्य नव्हे किंवा ते वाक्य म्हणजे विकासविरोधी राजकीय मागणीही नव्हे.

ती एक महाराष्ट्राचा समग्र विचार करून केलेली व्यावहारिक मागणी आहे. आज जग कुठे चाललंय ते पाहून, त्याचा अंदाज घेऊन केलेला विचार आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक उद्योग सुरू झाले, टिकले आणि वाढले ह्याचं कारण महाराष्ट्रात देशातील ह्या आैद्योगिक क्रांतीला दाद देईल असा श्रमिकवर्ग, कामगारवर्ग होता. आैद्योगिक प्रगतीला पूरक असा समाज इथे तयार होता. तो उदारमतवादी, उद्यमशील कार्यसंस्कृती असलेला आणि स्वागतशील असा समाज होता. संतांनी आणि नंतरच्या समाजसुधारकांनी इथली जमीन नव्या उद्यमशील समाजासाठी तयार करून ठेवली होती. समाज शिकलेला होता, ज्ञानी आणि कुशल होता. उद्योगांच्या वाढीसाठी लागणारी सामाजिक स्थिती इथे होती. त्यामुळे इथे बाहेरून भांडवल आलं, आणि येत राहिलं.

ह्या प्रक्रियेला सुमारे १०० वर्षांचा इतिहास आहे.

ह्यानंतर जग बदललं. देशाची परिस्थिती बदलली. अर्थव्यवस्था मोकळी झाली. जगाशी जोडली गेली. बाहेरील देशाचं भांडवल पूर्वी यायचंच पण आता ते अधिक प्रमाणात येऊ लागलं. अजून येणार आहे.

शेती, वस्तू निर्मिती करणारे कारखाने, व्यापार ह्याबरोबरच सेवा क्षेत्रं वाढायला लागलं. फक्त आपल्या देशात नाही तर सगळीकडेच हे घडलं. माहिती तंत्रज्ञानातील आणि इंटरनेटच्या सार्वत्रिकरणामुळे प्रचंड बदल झाला. त्याचा समाजावरही परिणाम झाला.

दरम्यान विविध कारणांमुळे शेती संकटात सापडू लागली. शेतीतील उत्पादन घटलं. तिथे एक अतिरिक्त श्रमिक वर्ग तयार झाला. तो नोकरी-धंद्यासाठी शहरात यायला लागला. दरम्यान शिक्षणाचा प्रसार झाला. शिकलेली पिढी तयार झाली. कामाच्या शोधात महाराष्ट्रातल्या शहरात येऊ लागली.

मुक्त अर्थव्यवस्थेमुळे शहरात रोजगार वाढला. सेवा क्षेत्रं, माहिती तंत्रज्ञान अशासारख्या क्षेत्रात कुशल कामगारांची मागणी वाढली. देशात कुणीही, कुठेही जाऊ शकतं, नोकरी धंदा करू शकतं असं असल्यानं बाहेरील राज्यातून १९९५ नंतर, आणि २००५ नंतर तर अधिक प्रमाणात, कामासाठी लोक येऊ लागले. आज आपण आकडेवारीत जायला नको पण महाराष्ट्राच्या इतिहासातलं ते आत्तापर्यंतचं सर्वात मोठं स्थलांतर होतं.

ह्याच सुमारास, आधीच शिक्षणाचं प्रमाण बाकीच्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अधिक असल्यानं, महाराष्ट्रातही रोजगाराची ही नवी संधी घेण्यासाठी इथला कुशल, शिकलेला तरूण सज्ज झाला. पण आज तो किंवा ती पहाते तेंव्हा दिसतं हे की ह्या सर्व नव्यानं प्रगती होत असलेल्या क्षेत्रात मराठी माणसाचं स्थान फार कमी आहे.

जेंव्हा एखाद्या प्रदेशात नव्यानं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असतो, त्याच भागातील माणूस ती कामं करायला सक्षम असतो, पण तरीही त्या स्थानिकाला त्या रोजगाराची संधी मिळत नाही तेंव्हा काय होतं? महाराष्ट्रात तसा रोजगार करू शकेल अशा कौशल्यांचा, तशा शिक्षणाचा माणूस नसेल तर वेगळी गोष्ट, पण तो तसा असेल, सक्षम असेल आणि तरीही त्याला नोकरी मिळत नसेल तर ते योग्य आहे का? आणि तसं झालं, वर्षानुवर्ष होत राहिलं तर काय काय होऊ शकेल?


  • एक तर त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होईल. त्याचा परिणाम सामाजिक स्थैर्यावर होईल.
  • नवतरूणांमध्ये एक प्रकारचं नैराश्य येईल.
  • सांस्कृतिक, भाषिक संघर्ष सुरू होईल. 
  • समाजातला एकजिनसीपणा, सांस्कृतिक विशेषता संपायला लागेल. 
  • भाषा संस्कृती लयाला जायला सुरूवात होईल.
  • प्रत्येक भूप्रदेशाची, त्यानी किती लोकसंख्या पेलावी ह्याची एक मर्यादा असते. त्याच भूभागावर अशी अनियंत्रित लोकसंख्या वाढत गेली तर त्या भागात पाणी, जमीन, हवा, वीज, जंगलं, पर्यावरण अशा संसाधनावर परिणाम होईल. त्यांची लूट होईल. त्यामुळे मग ह्या विनाकारण वाढत्या लोकसंख्येला पुरवठा होईल अशासाठी आसपासचा निसर्ग ओरबाडायला लागेल. त्याचे दूरगामी परिणाम होतील. आणि, असं होत राहिलं तर एक दिवस असा येईल की इतक्या लोकांना सामावून घ्यायला इथला निसर्ग कमी पडेल. निसर्गाची व्यवस्था कोसळेल. मग जे लोक कामासाठी आले ते परत जातील. किंवा दुसरीकडे जातील. मग जे इथलेच आहेत त्यांनी कुठे जायचं? 


की, त्यांनीही महाराष्ट्र सोडायचा?

म्हणून “महाराष्ट्रात निर्माण होत असलेल्या प्रत्येक रोजगारावर फक्त मराठी मुला-मुलींचाच अधिकार आणि कुणी मराठी नसेल तरच मग बाकीच्यांचा”  ही घोषणा म्हणजे नुसत्या टाळ्या घेण्यासाठी केलेली घोषणा नाही, किंवा बेलगाम राजकीय मागणीही नाही… तर दूरचा विचार करून महाराष्ट्र, तिची माणसं, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, तिथला निसर्ग, तिथली आजिविका ह्याची जपणूक होईल असा तो एक आर्थिक, राजकीय विचार आहे.


अनिल शिदोरे
विजयादशमी, ११ आॅक्टोबर २०१६

२० टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. अशा काही कंपन्या किंवा आैद्योगिक संस्था माहित असतील की जिथे मराठी माणसावर अन्याय होतो तर त्याविषयी अवश्य कळवा..

      हटवा
    2. विदर्भातील जनतेवर सर्वप्रकारे अन्याय झाला आहे. हे आपनास नव्याने सान्गन्याची तशी काही गरज नाही. पण आज इथे मी आयटी क्शेत्रात झालेल्या अन्याया बद्दल बोलणार आहे. आपण म्हणाल अन्याय कसला? तर तो असा, विदर्भात एकुन ११ जिल्हे आहेत. नागपुर,भन्डारा,अमरावती,अकोला,ब
      ुलढाना,वाशिम,चन्द्रपुर,गडचिरोली, यवतमाल, वर्धा, आणी गोन्दिया. या ११ जिल्ह्यातुन लाखो आयटी इन्जिनियर्स आतापर्यन्त बनलेत. पण, त्याना इथे विदर्भात रोजगार उपलब्ध नाही.कारण इथे आयटी कम्पन्याच नाहित. असतील त्याही बोटावर मोजन्या इतक्याच. आणी त्याला फ़ारसा अर्थही नाही. मी इथे हाच प्रश्न विचारु इच्चितो कि असे का? या भागातुन एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्जिनियर्स असुन देखिल आजपर्यन्त महाराष्ट्र सरकारने इथे कम्पन्या का आणल्या नाहीत? का इथे जागा उपलब्ध नाही? की आणखी काही? उत्तर द्या. सर्व प्रकारे उत्तम असनार्या विदर्भाला जानुन बुजुन मागे ठेवन्यात आलय,आणी आताही ठेवल जातय. इथल्या विद्यार्थ्यान्चा एकच मार्ग निश्चित झालेला आहे. खुप अभ्यास करायचा अभियन्त्रिकि शिक्शन घ्यायच आणि नोकरी साठी पुणे, मुम्बई किवा बेन्गलोर ला जायच. पण का जायच?? "का नागपूर आणि अमरावतीत आयटी कम्पण्या नाहीत" प्रश्न तसा भावनिक आहे. आपण लहानाचे मोठे ज्या भुमीत झालोय.ज्या वातावरणात आपली जडणघडन झाली आहे. ती जागा आपण नोकरी निमित्त्याने कायमची सोडुन द्यावी? विदर्भात जागा, पाणी, विज या तिनही गोष्टी उपलब्ध असताना केवळ राजकिय स्वार्था पोटी आप-आपल्या मतदार सन्घाचा विकास करणार्या नेत्याना मला जाब विचारायचा आहे. पुण्या मुम्बईत असनार्या प्रत्येक वैदर्भिय इन्जिनियर्च्या मनात आज हा प्रश्न आहे की, एक स्वतचा फ्ल्याट विकत घेन्यासाठी अवघ आयुश्य घालवण्या पेक्शा त्याच्याच भागात म्हणजे विदर्भात जर त्याच्यासाठी रोजगार उपलब्ध असता तर.. तोही "त्याच्या राह्त्या घरी सुखाने चार घास त्याच्या कुटुम्बीयानसोबत खाउ शकला असता." आज तिकडे त्याचे आई-वडील मुलाला उच्च शिक्शण देउन एकटे पड्ले आहेत. मुलगा/मुलगी आपल्या जवळ रहावे असे त्यानाही वाटते पण काय कराव? या शासनाने त्यान्च्या मुलानसाठी तशी रोजगाराची सोयच इथे केलेली नाही. मुलगा दोन दिवसासाठी सुटीत गावी आले असताना घरी जशी दसरा दिवाळी असल्या सारख वाटत. पण तेच दोन दिवसानन्तर त्यान्च्या परतिच्या प्रवासावेळी आई-वडील, भाउ-बहीण यान्च्या डोळ्यातील आसवे थाम्बत नाहीत. कसातरी आव आणून मुलगा-मुलगी पाणावलेल्या डोळ्यान्नी पुण्या मुम्बई ला जायला निघतो. काही दुर गेल्यावर आईचा फ़ोन येतो,"बाळा व्यवस्थीत बसलास न? सामान वगैरे बरोबर आहे न ? जेवन करुन घे." तेवढ्यात मुलगा विचारतो "आई तु जेवलीस का?" आई तिकडन हळु आवाजात म्हणते "जेवायची इच्चा नाहीरे बाळा आज." मुलगाही आईला न जेवण्याच कारण विचारत नाही. कारण त्याला माहिती असत... कुण्या आईच लेकरु तिच्या पासुन दुर गेल्यावर तिला काय जेवावस वाटनार? तरी तो म्हणतो "आई तु जेउन घे आणि बाबाना पण जेवायला लाव" न राहवता आईच्या तोन्डुन शब्द निघतात "तु गेल्यावर बाबा ढसा-ढसा रडलेत रे आज" सान्गा त्या मुलाची काय अवस्था होत असेल अश्या वेळी, ज्या बापाने आपल्याला लहाणाचा मोठा केला, जिवनातील प्रत्येक प्रश्नाला खम्बीररीत्या सामोरा गेलेला माणुस आज आपल्यासाठी पार रडतोय. यापेक्शा ह्रुदय हेलावनार काय असेल? लहान भाउ चिन्टुला फ़ोन दे म्ह्टल्यावर कळते की तोही दादा पुण्याला गेला म्हणून न जेवताच झोपी गेलाय.. बस्स, यापुढे काही बोलायची इच्चाच होत नाही. आपला गहीवरलेला आवाज आईला ऐकु जाउ नये म्हणुन मुलगाच फ़ोन कट करतो.. आणि तोही नन्तर हुन्दके आवरु शकत नाही.. काही वेळाने स्वतच आपले डोळे पुसतो आणि विचार करत करत झोपी जातो..का आपल्या नशीबी घरच्यान्सोबत रहाणे नाही का ?? का पुण्या-मुम्बईत स्वतच घर असनार्या लोकान्सारख आपणही सन्ध्याकाळी ओफ़िस मधुन आल्यावर ब्याग आपटुन आई मला भुक लागली काहीतरी खायला दे नाही म्हनु शकत?? आपल्या नशिबी का ती दुसर्या तिसर्या मजल्यावर असनारी भाड्याची भकास,उदास आणि आपल्या जिवलग कुटुम्बियान्च्या पोकळीची सतत जाणिव करुन देणारी खोली?? पुण्या- मुम्बई सारख्या गर्दीतल्या शहरांत राहून देखील आम्ही एकट पडलोय.लाखोन्चे प्याकेज असतानाही हे पैसे गावाकडच्या आपल्या घरातील जिथे आपले कुटूम्बीय आहेत त्या घरातील लाड मुळीच पुरवू शकत नाहीत.....
      -अमित वि. अस्वार-9764648555
      मित्रान्नो आवडला असेल तर नक्की शेअर करा.. जाउद्या त्या मुम्बईत बसलेल्या मन्त्र्यानपर्यन्त. एखाद्याच्या काळजाला आपल्या जखमेची वेदना जाणवलीच तर करतील काहीतरी विदर्भात... नाही तर आपल्या दोन-दोन दिवसान्च्या तोकड्या सुट्ट्या आहेतच...

      हटवा
  2. अगदी बरोबर सर. मला अजुन 1सांगवस वाटत की कंत्राटी पद्धत ही बंद व्हायला पाहिजे कारण याच्यामुळे कामगारांची पूर्ण पिळवणुक होते आज परप्रांतीय कामगार इथे आला नसता तर अजून सर्व दृष्टया महाराष्ट्र कितीतरी पटिने सुखी झाला असता.कंत्राटी पद्धत्ति वर आपन अभ्यास करुण मार्गदर्शन करावे सर .धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मला थोडा तपशील देता येईल का? त्यावर की करतोच आहे, पण... दुसरं असं की ह्या वेळचे नोबेल पारितोषकही कंत्राटांचं अर्थशास्त्र ह्यावरच आहे ... मी वाट पहातो.

      हटवा
  3. खर तर सर्वच राजकीय पुढार्यांनी एकत्र येऊन पुढील विनाशाला (आक्रमणाला) वेळीच रोखून महाराष्ट्रातील सर्वच शहरांना वाचविणे गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यावद ... ही मोठी लढाई आहे. तुमची साथ असू दे.

    उत्तर द्याहटवा
  5. Maharashtrachya youth la reservation peksha rojgaravar charcha havi aahe. ....aani aapan tyat ek Paul pudhe takat aahat. ...khup chhan. ...

    उत्तर द्याहटवा
  6. धन्यवाद... अजून खूप पल्ला गाठायचा आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. Correct but we also should migrate in large numbers and developing taluka places is most important

    उत्तर द्याहटवा
  8. Correct but we also should migrate in large numbers and developing taluka places is most important

    उत्तर द्याहटवा
  9. अनिल साहेब रोजगार हया विषयावर आपण जास्त लक्ष आणि आवाज उठवायला पाहीजे,,,पूर्ण महाराष्ट्र साथ देईल

    उत्तर द्याहटवा
  10. सर,
    वस्तुस्थिती मांडलीत तुम्ही पण लोक समजुन घेत नाहीत, ते फक्त एकाच अँगल ने पाहतात.... ते म्हणजे "राजकारण"
    एक वेळ अशी येइल कि लोकांना विचार पटतील, पण तेंव्हा उशीर झाला असेल.

    - प्रकाश गुंजाळ

    उत्तर द्याहटवा
  11. खरंच या दिशेने पाऊलं उचलली पाहिजे.. मराठी विषयात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी तर फारच कमी आहेत परीणामतः मराठीकडे मुलं वळत नाहीत.. त्यादृष्टीने विचार करण गरजेचं आहे.. लेख फारच छान आणि मुद्देसूद आहे. विषयाची अचूक मांडणी

    उत्तर द्याहटवा
  12. खरंच या दिशेने पाऊलं उचलली पाहिजे.. मराठी विषयात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी तर फारच कमी आहेत परीणामतः मराठीकडे मुलं वळत नाहीत.. त्यादृष्टीने विचार करण गरजेचं आहे.. लेख फारच छान आणि मुद्देसूद आहे. विषयाची अचूक मांडणी

    उत्तर द्याहटवा
  13. खरंच या दिशेने पाऊलं उचलली पाहिजे.. मराठी विषयात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी तर फारच कमी आहेत परीणामतः मराठीकडे मुलं वळत नाहीत.. त्यादृष्टीने विचार करण गरजेचं आहे.. लेख फारच छान आणि मुद्देसूद आहे. विषयाची अचूक मांडणी

    उत्तर द्याहटवा
  14. खरंच या दिशेने पाऊलं उचलली पाहिजे.. मराठी विषयात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी तर फारच कमी आहेत परीणामतः मराठीकडे मुलं वळत नाहीत.. त्यादृष्टीने विचार करण गरजेचं आहे.. लेख फारच छान आणि मुद्देसूद आहे. विषयाची अचूक मांडणी

    उत्तर द्याहटवा
  15. सर रोजगाराच काम हाती घेतले आहे... आता आपल्या मार्गदर्शन आणी आशिर्वादाची गरज आहे.. सर अभीमान वाटेल असच काम करील, रोजगार आणी स्वयंरोजगार विभागात..... जय मनसे... जय महाराष्ट्र..
    धन्यवाद
    संजू पाखरे

    उत्तर द्याहटवा
  16. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत आल्यावर यावर नक्कीच काहीतरी ठोस पावले उचलेल अशी आम्हाला आशा आहे!
    महाराष्ट्रात सर्व काही मराठीतच झाले पाहिजे!
    अप्रतिम लेख!
    धन्यवाद!
    जय महाराष्ट्र!

    उत्तर द्याहटवा