दुष्काळाचा स्वभाव आणि काय करायला हवे?
सध्या दुष्काळाची चर्चा महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्रावरील हे एक संकट आहे ह्यात वाद नाही, पण संकटा-संकटांमध्येही फरक असतो. एखादा भूकंप येतो आणि मिनिट-दोन मिनिटात होत्याचं नव्हतं करून जातो. सुनामी, पूर, चक्रीवादळ ह्या प्रत्येक संकटांचं स्वत:चं असं वैशिष्ट्य आहे, पण ह्यातली बहुतेक अचानक येतात, अक्राळ-विक्राळ आवाज करत येतात आणि थोड्या वेळात हाहा:कार माजवतात.
ह्या संकटांपेक्षा दुष्काळ वेगळा आहे. तो हळू हळू येतो, चोर पावलांनी येतो, येत रहातो आणि येता येता माणसांची आजिवीका (Livelihoods) कायमची उद्धवस्त करून टाकतो. माणसाला त्याच्या मातीपासून, मुळापासून तोडतो. त्याला सर्व कुटुंब कबिला घेऊन त्याचं गाव सोडावं लागतं, पुन्हा परत न येण्यासाठी.
त्याची आजिवीका मुळापासुन नष्ट झाल्यानं त्याच्या संस्कृतीलाही धक्के बसतात, तडे जातात आणि त्याचं अस्तित्वही धोक्यात येतं.
दुष्काळ म्हणून ह्यातला फार भयानक. माणसाला मुळापासून तोडणारा.
अर्थात, दुष्काळ जसा हळू येतो तसाच तो हळू जातोही हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. माणसाच्या अथक प्रयत्नानं, मेहनतीनं, तंत्रज्ञानानं त्यावर मात करता येते, कायमची मात करता येते. जगातल्या संस्कृतींनी असी उत्तरं शोधली आहेत. महाराष्ट्रालाही अशी उत्तरं शोधावी लागतील.
दुष्काळ कसा हटवायचा ह्याला जसं उत्तर शासकीय प्रयत्नांमध्ये आहे, धोरणांमध्ये आहे, तंत्रज्ञानामध्ये आहे, तसं पीकपद्धतीमध्ये आहे, आपल्या जीवनशैलीमध्ये आहे, समाजाला जागं करण्यामध्ये आहे, संस्कृतीमध्येही आहे. महाराष्ट्राला अशी सर्व अंगानं उत्तरं शोधावी लागतील. फक्त शासकीय पातळीवर, फक्त राजकारणात, फक्त धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये ही उत्तरं नाहीत, पण एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून आपल्या जीवनशैलीत बदल करूनही आपण हा दुष्काळ हटवण्याच्या कामात हातभार लावू शकतो.
ते काय आणि कसं हे शोधून काढलं पाहिजे. दुष्काळ हटवण्यासाठीची एक मोठी चळवळ सुरु केली पाहिजे जी ह्या प्रश्नाची उत्तरं आपल्या जगण्यात शोधतील, जगण्यातून शोधतील. नुसतं शासन, सरकार किंवा राजकीय पक्ष ह्याला पुरे पडणार नाहीत.
"मैत्री" सारख्या स्वयंस्फूर्त संघटनांची ह्यातली भुमिका फार मोलाची आहे. अशा संस्था, संघटनांनी, नागरिकांच्या स्वयंस्फूर्त गटांनी ही चळवळ मोठी केली पाहिजे, वाढवली पाहिजे. कदाचित ह्यातूनच आपल्याला आजच्या काळातला युगधर्म - "महाराष्ट्र धर्म" सापडेल.

Sir tumche vichar khrach aprati aahet....
उत्तर द्याहटवासर मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे..या वर्षी पाऊस कमी पडला म्हणून सिंचनाचा विषय पुढे आला..२०१२ मध्ये का नाही कोणी सिंचनाच्या विषयावर एवढ्या निर्भीडपणे व्यक्तव्य केल..
उत्तर द्याहटवा